महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार साजिद खान पठाण यांची नियुक्ती

महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार साजिद खान पठाण यांची नियुक्ती
महाराष्ट्र काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार साजिद खान पठाण यांची नियुक्ती

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. ७ :- अखिल भारतीय काँग्रेस समितीने (AICC) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी आमदार साजिद खान पठाण यांची नियुक्ती जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी या नियुक्तीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून ही नियुक्ती तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली. साजिद खान पठाण यांच्या नियुक्तीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे.

आमदार साजिद खान पठाण यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपवली असून, राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी तसेच काँग्रेस पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करणार आहेत.

या नियुक्तीनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून साजिद खान पठाण यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आगामी राजकीय घडामोडी आणि संघटन विस्ताराच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.