राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती विमान दुर्घटनेतील मृतांना मनसेकडून श्रद्धांजली

राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती विमान दुर्घटनेतील मृतांना मनसेकडून श्रद्धांजली
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरती विमान दुर्घटनेतील मृतांना मनसेकडून श्रद्धांजली

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १४ जून:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगर शाखेच्यावतीने आज मनसे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे ग्रामदैवत श्री सुपारी हनुमान मंदिर, गुलमंडी येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून मृतात्म्यांना आदरांजली वाहिली.

या वेळी मनसे नेते प्रकाश महाजन, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, आशिष सुरडकर, गजन गौडा पाटील यांच्यासह छत्रपती संभाजीनगर शहरातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मनसे कार्यकर्त्यांनी समाजहितासाठी एकजूट राहण्याचा संदेश दिला

.