रमजानमध्ये रोजेदारांसाठी कामाचे तास कमी करा!; Abu Azmi यांची Devendra Fadnavis यांच्याकडे मोठी मागणी

रमजानमध्ये रोजेदारांसाठी कामाचे तास कमी करा!; Abu Azmi यांची Devendra Fadnavis यांच्याकडे मोठी मागणी

महाराष्ट्र वाणी 

मुंबई दि २२ :- Ramadan सुरू असताना मुस्लिम समाजासाठी हा अत्यंत पवित्र आणि आत्मशुद्धीचा महिना मानला जातो. रोजा, नमाज, इबादत आणि दानधर्म यांना या काळात विशेष महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी महाराष्ट्र सरकारकडे विशेष सवलती जाहीर करण्याची मागणी केली आहे.

अबू आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत सांगितले की, रमजान महिन्यात रोजा पाळणाऱ्या आणि नमाज अदा करणाऱ्या सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुपारी ४ वाजेपर्यंतच कार्यालयीन कामकाज ठेवून त्यानंतर सुट्टीची परवानगी द्यावी. “रोजा करणाऱ्यांना दिवसभर उपवासासह नियमित कामकाज करावे लागते. त्यामुळे त्यांना सायंकाळच्या इफ्तार आणि नमाजसाठी पुरेसा वेळ मिळावा, यासाठी ही सवलत आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

आझमी यांनी उदाहरण देताना सांगितले की, Andhra Pradesh आणि Telangana या राज्यांत रमजान काळात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना दुपारी ४ नंतर सुट्टी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.

मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना आणि परंपरा लक्षात घेऊन सरकारने सहानुभूतीपूर्वक निर्णय घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

रोजेदारांना दिलासा मिळणार का? राज्य सरकारचा निर्णय ठरेल महत्त्वाचा!