मराठवाड्यात उलमा बोर्डच्या मुतवल्ली व शिक्षण विंगची कार्यकारिणी जाहीर; पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा संपन्न
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २० :– ऑल इंडिया उलमा बोर्डच्या मुतवल्ली विंग व शिक्षण विंगच्या वतीने मराठवाडा विभागातील नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. शहरातील सूबेदारी गेस्ट हाऊस येथे रविवारी (दि. १९ एप्रिल) दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला बीबी का मकबऱ्याचे मुतवल्ली व उलमा बोर्ड मुतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल इकबाल मुजावर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा गुलपोशीद्वारे सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना शेख फैसल इकबाल मुजावर यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील मुतवल्ली, खादिम, मुजावर, खुद्दाम, पीरजादे व ट्रस्टी यांनी वक्फ बोर्डाशी संबंधित कागदपत्रे कायदेशीर पद्धतीने पूर्ण करून घ्यावीत. वक्फ कायद्याबाबत योग्य मार्गदर्शन देऊन सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी मुतवल्ली विंग कार्यरत राहील. कोणालाही माहिती अथवा मदत हवी असल्यास त्यांनी उलमा बोर्डाशी संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले.
या वेळी औरंगाबाद शहर अध्यक्षपदी उस्मान हबीब खान यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी मोहम्मद युनूस, सैयद फहीमुद्दीन सूतारी व साजिदा बेगम यांची नियुक्ती झाली. सोशल मीडिया शहर अध्यक्ष म्हणून शेख अल्ताफ यांची जबाबदारी सोपविण्यात आली. तसेच जालना जिल्हाध्यक्षपदी गौस अबरार खान, परभणी जिल्हाध्यक्षपदी अशरफ नईमुद्दीन कादरी, लातूर जिल्हाध्यक्षपदी वकील अजीम अब्दुल रज्जाक यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
महिला मराठवाडा अध्यक्षा शकीला नाजे पठाण, औरंगाबाद महिला अध्यक्षा सीमा मांडविया शेख व खालेद पठाण यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
दरम्यान, शिक्षण विंगचे प्रदेशाध्यक्ष नबी वजीर पटेल यांनी बीड जिल्हाध्यक्षपदी शेख कमर, औरंगाबाद जिल्हाध्यक्षपदी प्रा. शेख जावेद, शहर अध्यक्षपदी मुमताज पटेल तसेच मराठवाडा उपाध्यक्षपदी शेख इस्माईल पटेल यांची नियुक्ती जाहीर केली. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला उलमा बोर्डचे वकील जीशान अली जैदी, अहमद अली खान, शेख महबूब, शेख फहाद मुजावर, शेख मोबिन इनामदार, शेख मुंतजिर पीरजादे, शेख फरहान मुजावर, शेख गुलाम कादिर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
“नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून वक्फ व शिक्षण क्षेत्रात न्यायासाठी लढा अधिक बळकट होणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.”