सोनम वांगचुक प्रकरण व NEET-TET पेपरफुटीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे 20 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

सोनम वांगचुक प्रकरण व NEET-TET पेपरफुटीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे 20 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर, दि. १९ :- विद्यार्थ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी आंदोलन करणारे पर्यावरणवादी व शिक्षण सुधारक सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांच्या मदतीने आंदोलनस्थळावरून हटविल्याच्या घटनेचा निषेध, तसेच देशभरातील NEET आणि महाराष्ट्रातील TET पेपरफुटी प्रकरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने सोमवारी 20 जुलै 2026 रोजी आंदोलन करण्यात येणार आहे.

हे आंदोलन सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणार असून, पक्षाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी खासदार, आमदार, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनातून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांचा प्रश्न, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येणार असल्याचे पक्षाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

या आंदोलनाचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण आणि शहर कार्याध्यक्ष आशिष पवार यांनी केले आहे.