मुस्लिम युवकाच्या हत्येने खळबळ; इम्तियाज जलीलांची पोलिस अधीक्षकांकडे धाव

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर/वैजापूर दि १३ जून :- वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावात एका मुस्लिम युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून, दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी तातडीने ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनय कुमार राठोड यांची भेट घेतली. त्यांनी पोलिस प्रशासनाकडे या गंभीर घटनेतील दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

यावर पोलीस अधीक्षकांनी खात्री दिली की, “संपूर्ण तपास जलद गतीने सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. कोणत्याही आरोपीला पळून जाण्याची संधी दिली जाणार नाही.”

सध्या खंडाला गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.