जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; शिवकन्या संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; शिवकन्या संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम
जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा सन्मान; शिवकन्या संस्थेचा प्रेरणादायी उपक्रम

महाराष्ट्र वाणी 

जळगाव, दि. ७ :- जागतिक महिला दिनानिमित्त शिवकन्या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा सन्मान करून त्यांच्या समाजातील योगदानाचा गौरव करण्यात आला. संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभिलाषा आशा भिला रोकडे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या आणि समाजाच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा यावेळी शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. लहानग्यांच्या शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस सातत्याने काम करत असल्याने त्यांच्या कार्याचे कौतुक करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी रोकडे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात कल्पना दिलीप खैरनार (सेविका), सुनीता दगडू शिंपी (सेविका), उज्वला निवृत्ती वानखेडे (सेविका), योगिता विक्रम चौधरी (सेविका), मीनाक्षी दिलीप जोशी (सेविका) तसेच रूपाली राहुल मणियार (मदतनीस) यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास अंगणवाडीच्या सीडीपीओ सौ. जिजा राठोड, भारती रवींद्र इंगळे (मदतनीस), अरुणा सुखदेव पवार (सेविका), सुशीला यादव महाजन (मदतनीस) तसेच विद्यार्थी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते.

समाजातील महिलांचे योगदान ओळखून त्यांचा सन्मान करणे हीच खरी महिला दिनाची सार्थकता असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.