“घाटी रुग्णांना दिलासा: सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्या आता निम्म्या दरात!”

✍️ बातमी: महाराष्ट्र वाणी न्युज
(प्रत्येक आमदाराला 1 कोटी स्मशानभूमीसाठी, जिल्हा नियोजन समितीची महत्वाची निर्णय बैठक)
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) १२ जून :- घाटी रुग्णालयात (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय) येणाऱ्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी. सीटी स्कॅन व एमआरआय चाचण्यांवरील ५० टक्के शुल्क जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरले जाणार असून, रुग्णांना आता फक्त अर्धेच शुल्क भरावे लागणार आहे. हा निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४९ कोटींच्या वार्षिक नियतव्ययास मंजुरी देण्यात आली. यामध्ये ७३५ कोटी सर्वसाधारण योजनांसाठी, अनुसूचित जातीसाठी १०४ कोटी आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील योजनांसाठी १०.४६ कोटींचा समावेश आहे.
याच बैठकीत प्रत्येक आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील स्मशानभूमी दुरुस्तीसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्याचाही निर्णय झाला आहे.
महत्वाचे मुद्दे:
घाटी रुग्णांना सीटी/एमआरआय ५०% कमी दरात.
स्मशानभूमी दुरुस्तीसाठी प्रत्येक आमदाराला १ कोटी निधी.
प्रत्येक विभागाने वृक्ष लागवडीचे वेळापत्रक तयार करावे.
सिद्धार्थ उद्यान दुर्घटनेची चौकशी होणार.
शासकीय इमारतींवर सोलर लावण्याचे निर्देश – मंत्री अतुल सावे.
शेतकऱ्यांच्या कर्ज, बियाणे, खत, पाणी प्रश्नांवर ठोस मागण्या.