क्रांतीसूर्य युवा प्रतिष्ठानतर्फे जागतिक आदिवासी दिन साजरा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- क्रांतीसूर्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुकुंदवाडी परिसरातील संतोषी माता नगर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यावेळी क्रांतीसूर्य युवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला क्रांतीसूर्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास रोकडे, उपाध्यक्ष प्रदीपभाऊ अंबिलढगे, सचिव यशराज इंचाळकर, प्रमुख मार्गदर्शक व ज्येष्ठ नेते शेषरावजी शिंदे, तसेच संदीप आगळे, चंदू वाघमारे, रोहित भाजीपाले आदी उपस्थित होते.
जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासी समाजाच्या हक्क, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक योगदानाचे स्मरण करण्यात आले.