बोरगाव सारवणीत इद्रिस मुलतानी यांचा सत्कार; उर्दू शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन, मुस्लिम समाज बांधवांचा भाजपमध्ये प्रवेश

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड/ बोरगाव सारवानी दि १३ :- सिल्लोड तालुक्यातील बोरगाव सारवणी येथे मुस्लिम समाज अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री दर्जासह निवड झाल्याबद्दल इद्रिस मुलतानी यांचा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत आगामी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

याच कार्यक्रमात इनामुल उलुम उर्दू हायस्कूलच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, कार्यक्रमाच्या निमित्ताने मुस्लिम समाजातील अनेक नागरिकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत त्यांनी भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

कार्यक्रमाला भाजपा नेते सुरेश बनकर, माजी सभापती अशोक गरूड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, माजी सभापती ज्ञानेश्वर तायडे, जिल्हा परिषद सदस्य राधाकृष्ण काकडे, भाजपा अंधारी मंडळ तालुकाध्यक्ष नारायण खोमणे, तसेच जगदीश कवाल, ज्ञानेश्वर साळुंके, भागवत शिंदे, प्रवीण उमारिया, संजय शिंदे, संजय निकम, जितेंद्र जैस्वाल, अजित शेख, ताजमत कुरेशी आणि डॉ. नजीर शेख यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, मुस्लिम समाज बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर उपस्थित मान्यवरांनी संवाद साधला.