औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट; अब्दुल समीर सत्तार आणि आमदार संजना जाधव यांचे अर्ज अपीलमध्ये वैध
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १९ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्वाचे राजकीय वळण आले आहे. यापूर्वी छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आलेले अब्दुल समीर अब्दुल सत्तार आणि आमदार संजना जाधव यांच्यासह अनेक उमेदवारांचे अर्ज अपील प्रक्रियेनंतर वैध ठरविण्यात आले आहेत.
अपील अधिकाऱ्यांनी सुनावणीदरम्यान विविध अर्जांवर निर्णय देत अनेक उमेदवारांना दिलासा दिला. त्यानुसार अब्दुल समीर अब्दुल सत्तार, प्रनिकेत अनिल पाटील, सुवर्णा संजय जाधव, मनोज महारू राठोड, रितेश कल्याणचंद मुनोत, रंजना हर्षवर्धन जाधव, प्रदीप माधवराव शिंदे आणि मनोज नानासाहेब देशमुख यांचे अपील मंजूर करण्यात आले.
तर इंदुमती साहेबराव पाटील यांचे अपील फेटाळण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत चुरस आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — राजकीय घडामोडींचा प्रत्येक अपडेट सर्वात आधी!