सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्षपदी उबेद बापू देशमुख यांची नियुक्ती; राष्ट्रवादी भवनात सत्कार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे निष्ठावंत पदाधिकारी उबेद बापू देशमुख यांची सिल्लोड-सोयगाव विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी त्यांच्या निष्ठेची, पक्षनिष्ठ कार्याची आणि संघटनात्मक कष्टाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली.
या निवडीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उबेद बापू देशमुख यांचे अभिनंदन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात पक्षाचे संघटन अधिक बळकट होईल तसेच पक्षाची भूमिका आणि तुतारीचा आवाज घराघरांत पोहोचेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी भवन येथे आयोजित कार्यक्रमात पक्षाचे राज्यस्तरीय नेते, जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी उबेद बापू देशमुख यांचा सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
"संघटन मजबूत करण्यासाठी नव्या जबाबदारीसह उबेद बापू देशमुख सज्ज; सिल्लोड-सोयगावात राष्ट्रवादीची ताकद वाढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे."