“501 रुपयांत भरू शकते एका बेवारसाची भूक… माई वृद्धाश्रमाची हाक समाजाला!”

“501 रुपयांत भरू शकते एका बेवारसाची भूक… माई वृद्धाश्रमाची हाक समाजाला!”

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३० :- जिल्ह्यातील माई वृद्धाश्रम सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. फेब्रुवारी 2026 महिन्यात मदतीचा हात पुढे करणाऱ्या सर्व दानशूर दात्यांचे आश्रमाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. मात्र, मार्च महिन्यात वाढलेल्या खर्चामुळे आश्रमासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

पाणी, वीज, गॅस, किराणा, औषधे, दूध, भाजीपाला अशा जीवनावश्यक खर्चांसोबतच तब्बल 20 हजार रुपयांचे बिल प्रलंबित आहे. त्यातच आश्रमातील तांदूळ आणि राशन पूर्णतः संपले असून, अनाथ व निराधार वृद्धांच्या अन्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

 “तुमची छोटीशी मदत, कोणाच्या पोटातला मोठा घास बनू शकते…”

माई वृद्धाश्रमात राहणाऱ्या वृद्धांना दोन वेळचे अन्न मिळावे, त्यांची औषधे सुरू राहावीत यासाठी समाजातील दानशूर नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

💰 आपण कशी मदत करू शकता?

₹501 / ₹1001 / ₹2100 / ₹5001 देणगी

किंवा थेट किराणा साहित्य (तांदूळ, डाळी, तेल, साखर इ.)

औषधे, दूध, भाजीपाला

📱 फोनपे द्वारे मदत: 8888125610

📞 संपर्क:

मीरा वाघमारे (संचालिका)

मो. 8421141104

 “आज तुमची मदत… उद्या कोणाचं जगणं वाचवू शकते!”