स्व. रावसाहेब कोतकर पुण्यतिथीनिमित्त माई वृद्धाश्रमात फळे व साहित्य वाटप

स्व. रावसाहेब कोतकर पुण्यतिथीनिमित्त माई वृद्धाश्रमात फळे व साहित्य वाटप
स्व. रावसाहेब कोतकर पुण्यतिथीनिमित्त माई वृद्धाश्रमात फळे व साहित्य वाटप

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ५ :- आंबेडकरी चळवळीतील युवा नेते सुनील कोतकर यांच्या वडिलांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त माई वृद्धाश्रमात अनाथ व निराधार ज्येष्ठ मातांसाठी फळे व उपयुक्त साहित्याचे वाटप करण्यात आले. समाजाप्रती कृतज्ञता आणि ज्येष्ठांप्रती आदर व्यक्त करणारा हा उपक्रम भावनिक वातावरणात पार पडला.

स्व. रावसाहेब किसनराव कोतकर (दादा) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृद्धाश्रमातील माईंना १० बकेट, १० जग, १० टोपल्या तसेच फळांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धांना आपुलकीचा आधार मिळाला असून समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी जिजाबाई कोतकर, सुनील कोतकर, वैशालीताई कोतकर, वैभव कोतकर, स्नेहा कोतकर व कोतकर परिवार उपस्थित होता. वृद्धाश्रमाच्या वतीने या समाजाभिमुख उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकी व संवेदनशीलता अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमावेळी आश्रमाच्या संचालिका मीरा वाघमारे, ऋत्विक वाघमारे व गौरव वाघमारे यांनी कोतकर परिवाराचे आभार मानले.

अशा समाजसेवेच्या उपक्रमातूनच माणुसकीचा खरा वारसा जपला जातो.