सिल्लोड तालुका NSUI ची कार्यकारिणी बैठक उत्साहात; विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा

सिल्लोड तालुका NSUI ची कार्यकारिणी बैठक उत्साहात; विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि ३ :- नेशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) सिल्लोड तालुक्याच्या वतीने महत्त्वपूर्ण कार्यकारिणी बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, शैक्षणिक अडचणी तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीस NSUI चे जिल्हाध्यक्ष अभिषेक शिंदे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सिल्लोड काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष निलेश काळे, शहराध्यक्ष आवेश आझाद तसेच सोयगाव तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष दिलीप मोरे देशमुख यांची विशेष उपस्थिती होती.

बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत नियोजन करण्यात आले.

सदर बैठकीचे नियोजन आणि आयोजन सिल्लोड तालुका NSUI चे तालुकाध्यक्ष अमन मुलतानी यांनी केले. यावेळी तालुक्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NSUI च्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.