आमदार प्रशांत बंब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप; व्हिडिओ-ऑडिओ पुरावे तपासून भाजपची कारवाईची मागणी

आमदार प्रशांत बंब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप; व्हिडिओ-ऑडिओ पुरावे तपासून भाजपची कारवाईची मागणी
आमदार प्रशांत बंब यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप; व्हिडिओ-ऑडिओ पुरावे तपासून भाजपची कारवाईची मागणी

महाराष्ट्र वाणी

गंगापूर दि १६ :- दिनांक १५ सप्टेंबर रोजी गंगापूर येथे झालेल्या आंदोलनादरम्यान आमदार प्रशांत बंब यांच्याबाबत काही शिक्षकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

तक्रारीत आंदोलनादरम्यान घडलेल्या प्रकाराची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या घटनेशी संबंधित उपलब्ध व्हिडिओ, ऑडिओ रेकॉर्डिंग आणि इतर पुरावे तपासून, त्यामध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे, माजी नगराध्यक्ष प्रदीप भैय्या पाटील, गटनेते विजय पानखडे, पंचायत समिती सदस्य बळीराम भाऊ खताळ, नगरसेवक मारुती खैरे, भाग्येश गंगवाल, दीपक साळवे, आनंद पाटील, राकेश कळसकर, राजेंद्र राठोड, भारत पाटील, अतुल रासकर, संदीप बोजावरे, जाफर शेख, सलमान शेख, अतर जहुंरी, कृष्णकांत व्यवहारे, सिराज पटेल, संपत रोडगे, अरुण भाऊ, सागर रामेश्वर पाटील, सतीश बारे, कृष्णा वायसळ, गावंडे पाटील, योगेश भाऊ चव्हाण, संजय अभंग, सोमनाथ शिंदे, रफिक खान तसेच भाजयुमो शहराध्यक्ष तेजस सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिसांकडून या तक्रारीवर चौकशी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.