वैजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 42 दिवसांच्या अथक तपासानंतर मोबाईल चोरटे जेरबंद; जालना येथून आरोपींना अटक

वैजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 42 दिवसांच्या अथक तपासानंतर मोबाईल चोरटे जेरबंद; जालना येथून आरोपींना अटक
वैजापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई! 42 दिवसांच्या अथक तपासानंतर मोबाईल चोरटे जेरबंद; जालना येथून आरोपींना अटक

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ११ :- ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मोबाईल चोरी प्रकरणातील दोन आरोपींना अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तब्बल 42 दिवसांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर आरोपींना जालना जिल्ह्यातील परतूर येथून ताब्यात घेण्यात आले.

वैजापूर येथील व्यंकटेशनगर परिसरातील दुकानदार ज्ञानेश्वर अशोक मतसागर यांनी 28 मार्च 2026 रोजी मोबाईल चोरीची फिर्याद वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक 201/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना दिले होते. त्यानुसार पथकाने गोपनीय माहितीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान गुफरान खाजा कुरेशी (रा. परतूर, जि. जालना) याने मोबाईल चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत त्याने साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर अबुमाज उर्फ अलतमस सादेक कुरेशी यालाही पोलिसांनी अटक केली.

आरोपींकडून 10 हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासासाठी वैजापूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनिरीक्षक महेश घुगे, कासीम शेख, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलबिरसिंग बहुरे, शिवाजी मगर, योगेश तरमळे आणि जीवन घोलप यांच्या पथकाने केली.

“42 दिवस तपास सुरू ठेवत आरोपींना गजाआड करणाऱ्या ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.”