राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन

राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन
राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेसकडून अभिवादन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- भारतरत्न आणि माजी पंतप्रधान Rajiv Gandhi यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सुभेदारी विश्रामगृह, दिल्ली गेट परिसरातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.

२१व्या शतकातील आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे, विज्ञान-तंत्रज्ञान, संगणकीकरण आणि माहिती क्रांतीची पायाभरणी करणारे तसेच पंचायत राज व्यवस्थेला बळकटी देणारे नेते म्हणून राजीव गांधी यांचे स्मरण करण्यात आले.

यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम तसेच माजी शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, जगन्नाथ काळे, माजी नगरसेवक इक्बालसिंग गील, संघटन महासचिव इंजि. विशाल बन्सवाल, गंगापूर तालुकाध्यक्ष सूर्यकांत गरड, महेंद्र रमंडवाल, साहेबराव बनकर, अनिस पटेल, मोईन कुरेशी, शेख अब्दुल रईस, शेख कैसर बाबा, योगेश थोरात, डॉ. सिकंदर शेख, नदीम सौदागर, साजिद कुरेशी, शफीक शहा, जय दवणे, अनिल नलावडे, रमेश काळे, अनिता भंडारी, शीला मगरे, हेमा पाटील, इरफान पठाण, देवराव पाटील, विशाल वडकर, बाबासाहेब पवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

“आधुनिक भारताच्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या नेत्याला काँग्रेसकडून कृतज्ञ अभिवादन!”