राँग साईडवाल्यांवर पोलिसांचा ‘धडक’ अॅक्शन – ८३० वाहनांवर कारवाई, ₹5.30 लाख दंड!

राँग साईडवाल्यांवर पोलिसांचा ‘धडक’ अॅक्शन – ८३० वाहनांवर कारवाई, ₹5.30 लाख दंड!
राँग साईडवाल्यांवर पोलिसांचा ‘धडक’ अॅक्शन – ८३० वाहनांवर कारवाई, ₹5.30 लाख दंड!

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ८:- शहरातील वाढत्या वाहतूक गोंधळाला आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी राँग साईडने वाहन चालवणाऱ्यांविरोधात दिनांक 7 एप्रील रोजी जोरदार मोहीम राबवली. या विशेष कारवाईत तब्बल ८३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ₹5,30,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार, श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडली.

📍 कारवाईची ठिकाणे:

मोंढा नाका, हायकोर्ट सिग्नल, सेशन कोर्ट सिग्नल, महावीर चौक, ओअॅसीस चौक

🕚 वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ५

या ५ तासांच्या कारवाईत मोठ्या प्रमाणात वाहनचालक राँग साईडने वाहन चालवत असल्याचे उघड झाले. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

👉 पोलिसांचा इशारा:

राँग साईड, ट्रिपल सीट, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही दररोज कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

🚦 नागरिकांना आवाहन:

वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःची आणि इतरांची सुरक्षितता जपा.

👉 नियम पाळा… नाहीतर पुढचा नंबर तुमचाच!