मराठा अधिकारी-कर्मचारी संघाच्या प्रथम राष्ट्रीय अधिवेशनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्याख्यान, समाजमेळावा, गुणवंत पाल्य व समाजसेवकांचा गौरव; रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
महाराष्ट्र वाणी
नेवासा दि १३ :- मराठा अधिकारी व कर्मचारी संघ, भारत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले प्रथम राष्ट्रीय अधिवेशन प्रवरासंगम, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे रविवार, ९ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. देशासह महाराष्ट्राच्या विविध भागांतून शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत असलेले अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने अधिवेशनाला उपस्थित होते.
प्रबोधन, संघटन, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणाऱ्या या अधिवेशनात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. व्याख्यान, समाजमेळावा, गुणवंत पाल्यांचा गौरव, समाजसेवकांचा सन्मान तसेच रक्तदान शिबिराला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ. अजय कळमकर, डॉ. बालाजी जाधव, ॲड. संजय कोतकर आणि अशोक कुठे यांनी सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक आणि संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन केले. समाजातील एकोपा मजबूत करण्यासोबतच शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीसाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
गुणवंत पाल्यांचा गौरव
शैक्षणिक, संशोधन, स्पर्धा परीक्षा, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत पाल्यांचा अधिवेशनात सन्मान करण्यात आला. यामध्ये डॉ. जयदिप रामदास कुंडे, निरज विकास थोरात, गोविंद जगन्नाथराव कदम, मेधांश मुकुंद पवळ, सार्थक शिवाजी काळे, श्रुती संजय सोमवंशी, विकास नीरज थोरात, अक्षय गणपती लोखंडे, विक्रम निरंजन घोरपाडे, अभिजित भाऊसाहेब शेळके, शिवांश पंढरीनाथ वाघाडे, प्रियांश पंढरीनाथ वाघाडे, ईशान निलेश खताळ आणि सार्थक विठ्ठल देशमुख यांचा गौरव करण्यात आला.
यासोबतच समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या समाजसेवकांचाही सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकी
अधिवेशनाच्या निमित्ताने आयोजित रक्तदान शिबिरालाही चांगला प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय रक्त केंद्र तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील रक्तपेढीचे यासाठी विशेष सहकार्य लाभले.
अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे आणि डॉ. अंजली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शुभम गुसिंगे, डॉ. झोहरा, डॉ. नम्रता राठोड, तंत्रज्ञ पाध्ये, समुपदेशक कोकिळा साबळे, अंजली कुशल, संदीप, सरफराज आणि मजहर शेख यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.
अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष लक्ष्मण खटिंग, उपाध्यक्ष पृथ्वीराज वाघाडे, सचिव अनिल पाटील यांच्यासह हनुमंत येवले, रावसाहेब जंगले, मुकुंद खिस्ते, प्रमोद पाटील, अनिल बावणे, गोविंद तांगडे, मुंजा गिराम, कृष्णा दुधाटे, गोवर्धन टेमक, गोविंद मुळे, दशरथ ढोले, एकनाथ बेल्हेकर, सचिन पाटील, किसन तुपे, किरण ताकटे, सुरेश कुंदे, तिलोत्तमा मापारी आणि नंदा गटकळ यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेवणनाथ पवार, अर्चना देशमुख आणि कल्पना कानाडे यांनी केले.
सामाजिक बांधिलकी, गुणवंतांचा गौरव, समाजसेवकांचा सन्मान, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि रक्तदानाचा संदेश देणारे मराठा अधिकारी व कर्मचारी संघ, भारताचे हे प्रथम राष्ट्रीय अधिवेशन उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडले.