एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद; 1 कोटींहून अधिक नोंदणी

एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद; 1 कोटींहून अधिक नोंदणी
एसटीच्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरात उत्स्फूर्त प्रतिसाद; 1 कोटींहून अधिक नोंदणी

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि १३ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. 12 ऑगस्टपर्यंत तब्बल 1 कोटी 1 लाख 73 हजार 838 प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी 64 लाख 91 हजार 65 कार्डे सक्रिय झाली आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ, सुरक्षित आणि कॅशलेस करण्याच्या उद्देशाने एनसीएमसी स्मार्ट कार्डची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना या कार्डचे वाटप करण्यात येत आहे.

दरम्यान, 1 सप्टेंबर 2026 पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

एनसीएमसी स्मार्ट कार्डमुळे एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार डिजिटल आणि अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, प्रवाशांना कॅशलेस प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.