मनसेचा ‘नवसंकल्प मेळावा’ १८ जूनला; बाळा नांदगावकर करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

मनसेचा ‘नवसंकल्प मेळावा’ १८ जूनला; बाळा नांदगावकर करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा पदाधिकारी नवसंकल्प मेळावा २०२६ चे आयोजन गुरुवार, १८ जून रोजी करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या आदेशानुसार आणि मनसे नेते तथा माजी गृहराज्यमंत्री Bala Nandgaonkar यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे.

तापडिया नाट्य मंदिर, निराला बाजार येथे सकाळी ११ वाजता होणाऱ्या या मेळाव्यास जिल्ह्यातील सर्व शहर व ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, विविध अंगीकृत सेनेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात संघटन मजबुती, आगामी राजकीय दिशा, पक्षवाढ आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. पक्षाच्या विस्तारासाठी नव्या उमेदीने आणि नव्या संकल्पाने कार्य करण्याचा संदेश यावेळी दिला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

"राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन संघटन अधिक सक्षम करण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे," असे मनसेच्या वतीने नमूद करण्यात आले आहे.

राजकारण, समाजकारण आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी वाचत राहा – महाराष्ट्र वाणी!