गंगापूरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराचा आढावा; आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती

गंगापूरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराचा आढावा; आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती
गंगापूरमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराचा आढावा; आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती

गंगापुर दि १८ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी गंगापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली. किरण डोणगावकर यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत निवडणुकीच्या तयारीसह मतदार याद्यांच्या तपासणीवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला आमदार अब्दुल सत्तार उपस्थित होते. यावेळी पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. तसेच डॉ. प्रतापसिंह पाटील यांना प्रथम पसंतीचे मतदान देऊन विजयी करण्याचे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले.

या बैठकीला विश्वजीत चव्हाण, कृष्णा डोणगावकर, किरण डोणगावकर, संपत छाजेड, मजहर पटेल, नईम मंसूरी, अर्जुन गाढे, सतीश ताठे, अजित बागवान, केशवराव तायडे, सूर्यकांत गराड आणि लक्ष्मण भुसारे यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित