बिडकीनमध्ये 69 वर्षीय व्यक्तीकडून गांजा जप्त; NDPS अंतर्गत गुन्हा दाखल

बिडकीनमध्ये 69 वर्षीय व्यक्तीकडून गांजा जप्त; NDPS अंतर्गत गुन्हा दाखल
बिडकीनमध्ये 69 वर्षीय व्यक्तीकडून गांजा जप्त; NDPS अंतर्गत गुन्हा दाखल

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- बिडकीन पोलिसांनी टकार मोहल्ला परिसरात कारवाई करत एका 69 वर्षीय व्यक्तीकडून 0.668 किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, लक्ष्मण विश्वनाथ कवडे (वय 69, रा. टकार मोहल्ला, बिडकीन, ता. पैठण) याच्याकडे 13 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7.27 वाजता बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याचे आढळून आले.

कारवाईदरम्यान 0.668 किलो गांजा मिळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांजाची अंदाजे विक्री किंमत ₹6,680 असून, जप्त मुद्देमालाचे पॅकिंगसह एकूण वजन 0.729 किलो आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग रतनसिंग सेना यांच्या फिर्यादीवरून बिडकीन पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 575/2026, कलम 8(C), 20(B) NDPS Act 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक झिंझुर्डे करीत आहेत.