छत्रपती संभाजीनगर लोकसभा संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश जैस्वाल; युवासेनेत नव्या जबाबदारीची धुरा

छत्रपती संभाजीनगर लोकसभा संपर्कप्रमुखपदी ऋषिकेश जैस्वाल; युवासेनेत नव्या जबाबदारीची धुरा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २४ :- युवासेना मराठवाडा निरीक्षक तथा नगरसेवक ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांची छत्रपती संभाजीनगर लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.

तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या शिफारशीवरून ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

युवासेनेच्या माध्यमातून एसआयआर प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवणे तसेच सदस्य नोंदणी अभियानाला गती देणे, हा या नियुक्तीमागील मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

ऋषिकेश जैस्वाल यांच्या निवडीबद्दल राजकीय वर्तुळात तसेच कार्यकर्त्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

👉 “नवी जबाबदारी, नवा उत्साह… आता युवासेनेची ताकद लोकसभेत दिसणार का?”