डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाविद्यालयांना सदिच्छा भेट
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यावतीने छत्रपती संभाजीनगर शहरातील विविध नामांकित महाविद्यालयांना सदिच्छा भेट देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या भेटीदरम्यान महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि सुजाण पदवीधर मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्न, युवकांचे भविष्य तसेच पदवीधरांच्या अडचणी आणि अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
शिक्षक आणि पदवीधरांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या महाविकास आघाडीच्या विचारांना व धोरणांना पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. उच्चशिक्षित, कर्तव्यदक्ष आणि शिक्षक-पदवीधरांच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व विधानपरिषदेत पाठविण्यासाठी डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.
शिक्षक आणि पदवीधरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले अमूल्य मत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हाअध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील,शहरअध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला,विद्यार्थी प्रदेशअध्यक्ष सुशील बोर्डे,शहरकार्याध्यक्ष आशिष पवार,प्रदेश सचिव प्रकाश इंगळे,प्रभाकर भोसले,आशिष इंगळे,योगेश घुगे,दिग्विजय शिंदे, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार अखलाख देशमुख,पंकज पिसे,नमित कदम,अजय गाडे आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित