छत्रपती संभाजीनगरात ओबीसी सेलला नवे बळ! राजा राजापूरकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

छत्रपती संभाजीनगरात ओबीसी सेलला नवे बळ! राजा राजापूरकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
छत्रपती संभाजीनगरात ओबीसी सेलला नवे बळ! राजा राजापूरकर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ४ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) ओबीसी सेलचे कार्यतत्पर प्रदेशाध्यक्ष मा. राजा राजापूरकर यांचे आज ऐतिहासिक नगरी छत्रपती संभाजीनगर येथे आगमन झाले. त्यांच्या उपस्थितीत पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

या प्रसंगी ओबीसी सेलच्या विविध पदांवर कार्यक्षम नेतृत्वाला संधी देत नियुक्तिपत्रांचे वितरण करण्यात आले.

विष्णू वसंतराव सीदलांबे यांची ओबीसी सेल छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच संतोष दादाराव जाधव यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. ओबीसी महिला आघाडीला बळकटी देण्यासाठी सौ. भाग्यश्री प्रकाश आष्टेकर यांची महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्त्यांमुळे पक्षाच्या ओबीसी सेलला नवसंजीवनी मिळणार असून आगामी काळात संघटन अधिक सक्षम करण्यासाठी या पदाधिकाऱ्यांकडून महत्त्वाची भूमिका बजावली जाणार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष पाडुरंग तांगडे पाटील यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

👉 “नव्या नियुक्त्यांमुळे संघटनाला गती; आता कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!”