भोकरदनमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला वेग; महाविकास आघाडीकडून विजयाचा निर्धार

भोकरदनमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला वेग; महाविकास आघाडीकडून विजयाचा निर्धार
भोकरदनमध्ये डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रचाराला वेग; महाविकास आघाडीकडून विजयाचा निर्धार

भोकरदन दि १४ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या प्रचारासाठी बैठक घेण्यात आली. माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या या बैठकीला माजी मंत्री राजेशभैय्या टोपे, डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष ॲड. संजय काळबांडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पदवीधर मतदार उपस्थित होते. याचवेळी प्रचार कार्यालयाचे उद्घाटनही करण्यात आले.

शिक्षण, रोजगार आणि पदवीधरांच्या प्रश्नांवर चर्चा

बैठकीत शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि पदवीधरांच्या हक्कांशी संबंधित मुद्द्यांवर सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. उपस्थितांनी आपले अनुभव आणि अपेक्षा मांडत पदवीधरांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याची गरज व्यक्त केली.

पदवीधरांच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी ठाम भूमिका घेणे ही आपली बांधिलकी असल्याचे डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थी, युवक आणि पदवीधरांच्या भविष्याशी निगडित प्रश्नांना प्राधान्य देत संवादाच्या माध्यमातून त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रचार कार्यालयाचे उद्घाटन; विजयासाठी एकजुटीचे आवाहन

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांना पसंती क्रमांक १ चे मत देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. प्रचाराच्या माध्यमातून पदवीधरांपर्यंत पोहोचून त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती

या बैठकीला युवानेते सुधाकर आण्णा दानवे, सुरेखाताई लहाने, रमेश शेठ सपकाळ, रामधन पाटील कळंबे, प्रा. डॉ. अंकुश जाधव, कैलासराव पुंगळे, राजेंद्र दसपुते, लक्ष्मण ठोंबरे, प्रा. विजय सुरासे, ज्ञानेश्वर चव्हाण, शफिक शेख, शब्बीर कुरेशी, नसीम पठाण, कदीर बापू, चंद्रकांत पगारे, अशोक पवार, प्रा. संग्रामराजे देशमुख, महेश औटी, नितीन शिवनकर, साबेत चाऊस, मुजीब सर, वसीम मिर्झा, रहमान भाई, रघुनाथ पंडित, पंडितराव इंगळे सर, सुभाषराव जगताप, अनिल देशपांडे, रगडे साहेब, राजू जाधव, गंगाधर कांबळे, रामदास रोडे, रामेश्वर जंजाळ आणि भगवान ठोंबरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध पक्षांचे कार्यकर्ते व पदवीधर मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित