छत्रपती प्राथमिक शाळेत उत्साहात शाळा प्रवेशोत्सव आणि मोफत पाठ्यपुस्तक वाटप
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ जून:- गारखेडा परिसरातील छत्रपती प्राथमिक शाळेत शैक्षणिक वर्ष २०२५-२६च्या प्रारंभी शाळा प्रवेशोत्सव व मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, खाऊ आणि गणवेशांचे वाटप करून शिक्षणाचा प्रारंभ साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष पाटील होते. प्रमुख उपस्थिती शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला व्यवहारे यांनी लाभली. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व आवश्यक शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विशेषतः नव्याने पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत खाऊ, शिक्षण साहित्य देऊन आनंददायी वातावरणात करण्यात आले.
यावेळी शाळाबाह्य राहिलेल्या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षकांनी पुढाकार घेऊन प्रत्येकी एक मुलगा व एक मुलगी अशा पद्धतीने मोफत गणवेश देऊन त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन शिक्षक रामदास वाघमारे यांनी केले.
या कार्यक्रमाला शिक्षक अण्णा आंधळे, सोनाली पाटील, तुकाराम शिंदे, काकासाहेब निकम यांची उपस्थिती होती. शेवटी शिक्षिका सोनाली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत आकर्षण निर्माण करणारा ठरला असून पालक व ग्रामस्थांनी त्याचे कौतुक खेले.