“कमरेला तलवार घेऊन फिरणारा तरुण जेरबंद” – सातारा पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- सातारा पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैधरित्या धारदार तलवार बाळगून फिरणाऱ्या एका तरुणाला अटक करत मोठी कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस ठाणे सातारा येथे गु.र.नं. 0227/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारतर्फे पोलीस अंमलदार सुभाष वामनराव पाचे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांना गुप्त माहिती मिळाली की, गोल्डन सिटी हॉस्पिटल परिसरात एक इसम धारदार तलवार घेऊन संशयास्पद हालचाली करत आहे. वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी आणि सहाय्यक पोलीस आयुक्त मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता संबंधित इसम पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. झडती घेतली असता त्याच्या कमरेला सुमारे ३ फूट लांबीची धारदार तलवार आढळून आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अनिकेत अरुण साळवे (वय 21, रा. ईटखेडा, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर) असे आहे.
सदर आरोपीने ही तलवार कुठून आणली याचा तपास सातारा पोलीस करत आहेत.
👉 गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी सातारा पोलिसांची ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिलासा देणारी ठरत आहे!