इम्तियाज जलील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन; BARTI-TRTI विद्यार्थ्यांचा समारोप व IGNITE Academy कडून टॅब वितरण
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), १६ जून :– BARTI व TRTI अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा समारोप सोहळा आज उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
"भविष्यात अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करताना समाजाप्रती आपल्या कर्तव्यांची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे," असे जलील यांनी सांगितले.
या सोहळ्यात IGNITE Academy संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना अँड्रॉइड टॅबलेट्सचे वितरण करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
कार्यक्रमात डॉ. कुणाल खरात, आकाश जाधव सर आणि ओम खरात सर यांचीही विशेष उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांनी मिळालेल्या टॅब्स आणि मार्गदर्शनाच्या आधारावर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.