अंभई जि.प. शाळेच्या उर्दू माध्यमासाठी शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड
महाराष्ट्र वाणी
अंभई / सिल्लोड दि २७ :- येथील केंद्रीय जिल्हा परिषद शाळेत उर्दू माध्यमाच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड पालकांच्या बैठकीत बिनविरोध करण्यात आली. केंद्रीय मुख्याध्यापक गौरव पोमणे आणि शाळेचे मुख्याध्यापक एम. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नसीर खान नसीब खान तर उपाध्यक्षपदी समीरा जावेद शाह यांची निवड करण्यात आली.
समितीच्या सदस्यपदी नाजिम इरफान खान, अनिस रफिक शाह, सय्यद समीना तौसिफ, सय्यद इमरान अहमद अली, जरीना जावेद कुरैशी, नसीर बशीर पठाण, शाहीन रईस शाह, सय्यद इरफान असद, अंजुम फहीम शाह, जावेद रऊफ शेख, रुमाना अलीम शेख आणि शाहिद रजा खान यांची निवड झाली.
एम. एम. शेख यांची शिक्षक प्रतिनिधी व सचिव म्हणून, मोबीन अबुल देशमुख यांची शिक्षणतज्ज्ञ म्हणून, तर शेख उस्मान निसार यांची शिक्षणप्रेमी म्हणून समितीत निवड करण्यात आली.
यावेळी रामदास पा. दुतोंडे, रब्बानी शाह, सुभान खान यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने समितीची निवड बिनविरोध पार पडली.