अंभईत गुलाबराव पाटलांची तोफ धडाडली; शिवसेना उमेदवारांसाठी मतदारांचा प्रचंड जनसागर!

अंभईत गुलाबराव पाटलांची तोफ धडाडली; शिवसेना उमेदवारांसाठी मतदारांचा प्रचंड जनसागर!
अंभईत गुलाबराव पाटलांची तोफ धडाडली; शिवसेना उमेदवारांसाठी मतदारांचा प्रचंड जनसागर!

महाराष्ट्र वाणी 

अंभई (ता. सिल्लोड) दि. ५ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत अंभई गटात शिवसेनेने जोरदार ताकद दाखवत विरोधकांची झोप उडवली आहे. अंभई येथे झालेल्या भव्य जाहीर प्रचार सभेत मतदारांचा अक्षरशः जनसागर उसळला आणि शिवसेनेच्या विजयाचा नारा दुमदुमला!

अंभई गटातील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, अंभई गणाच्या उमेदवार रजनीताई नगरे, तसेच केळगाव गणाच्या उमेदवार अर्चनाताई शिंदे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली होती.

या सभेला राज्याचे पाणीपुरवठा मंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सभेत त्यांनी विरोधकांवर जोरदार शब्दांत प्रहार करत स्पष्ट इशारा दिला की,

“जनतेची फसवणूक करणाऱ्यांना आता जनता जागा दाखवणार!”

गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करून विकासाची गती वाढवण्याचे आवाहन केले.

सभेत मतदारांचा उत्साह पाहता विरोधकांच्या गोटात खळबळ उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. गावागावात शिवसेनेच्या प्रचाराची लाट निर्माण झाली असून विजय निश्चित असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार अब्दुल सतार स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि अंभई गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंभईतील ही सभा म्हणजे शिवसेनेच्या विजयाचा रणशिंग फुंकल्यासारखी ठरली असून विरोधकांचा पराभव अटळ असल्याचे बोलले जात आहे.

जनतेचा कौल शिवसेनेकडेच — अंभईत विजयाचा भगवा झेंडा निश्चित!

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र वाणी सोबत राहा!