हेड कॉन्स्टेबलच्या सुपुत्राची मोठी झेप! हुजेरहासन खान IIT Hyderabad मध्ये, पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी केला गौरव
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. २४ :- शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत छत्रपती संभाजीनगर येथील हेड कॉन्स्टेबल इम्तियाज अली खान यांचे सुपुत्र हुजेरहासन खान यांनी प्रतिष्ठित IIT Hyderabad मध्ये निवड मिळवत कुटुंबासह पोलीस विभागाचेही नाव उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस विभागाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.
हुजेरहासन खान यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या IIT Hyderabad मध्ये प्रवेश मिळवला. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस विभागातही अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
यावेळी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) शर्मिष्ठा वालावलकर, DCP प्रशांत मोहिते (गुन्हे शाखा), DCP पंकज अतुलकर (झोन-1) तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांनी हुजेरहासन खान यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक आणि व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यांच्या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असून, कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
अशीच प्रेरणादायी आणि सकारात्मक बातम्यांसाठी वाचा — महाराष्ट्र वाणी