समीर शाह SDPI चे नवे जिल्हाध्यक्ष, 13 सदस्यीय समिती जाहीर – महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची घोषणा
महाराष्ट्र वाणी.com | छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), २ जून :
सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) च्या औरंगाबाद शाखेने समीर शाह (इंजिनिअर) यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत नवीन जिल्हा समितीची घोषणा केली. 13 सदस्यीय समितीच्या नियुक्तीसह, पक्षाने औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीत सहभागी होण्याची तयारी जाहीर केली आहे.
या निर्णयाची घोषणा जिल्हा प्रतिनिधी परिषदेत करण्यात आली. विशेष अतिथी म्हणून प्रदेश सहप्रभारी मुजाहिद हुबली, प्रदेश महासचिव सय्यद कलीम, प्रदेश समिती सदस्य हाफिज मोहतसिम आणि ज्येष्ठ नेते मुजम्मिल खान उपस्थित होते. त्यांनी नव्या समितीला शुभेच्छा दिल्या आणि औरंगाबादमध्ये सामाजिक न्याय व विकासासाठी पक्षाच्या भूमिका स्पष्ट केल्या.
समीर शाह यांचे वक्तव्य :
"ही जबाबदारी माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचा उद्देश सामाजिक आणि आर्थिक समस्या सोडवण्याचा असून, SDPI महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीयपणे भाग घेईल," असे समीर शाह म्हणाले.
नवीन जिल्हा समिती खालीलप्रमाणे :
1. समीर शाह – जिल्हाध्यक्ष
2. डॉ. हाफिज इमरान – जिल्हा उपाध्यक्ष
3. नदीम शेख – जिल्हा महासचिव
4. अब्दुल अलीम – जिल्हा महासचिव
5. मोहसीन खान – जिल्हा महासचिव
6. साकी अहमद – जिल्हा सचिव
7. काजी समीउल्लाह – जिल्हा कोषाध्यक्ष
8. जबीन शेख – जिल्हा सदस्य
9. अशरफ पठान – जिल्हा सदस्य
10. उमर मिर्जा – जिल्हा सदस्य
11. आरेफ शाह – जिल्हा सदस्य
12. साजिद पटेल – जिल्हा सदस्य
13. मुश्ताक शेख – जिल्हा सदस्य
प्रदेश महासचिव सय्यद कलीम यांची प्रतिक्रिया :
"नवीन समिती सामाजिक न्याय, समावेशकता आणि प्रादेशिक विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करेल. समीर शाह यांच्या नेतृत्वात SDPI औरंगाबादमध्ये एक प्रभावी पर्याय म्हणून उभा राहील."
संपर्क:
नदीम शेख, जिल्हा
महासचिव – SDPI औरंगाबाद
मो. 7843033052