"शेतकऱ्यांच्या दु:खात शासन खंबीरपणे सोबत!" ३४ लाखांची मदत आमदार अब्दुल सत्तार यांचा पुढाकार
महाराष्ट्र वाणी न्युज
सिल्लोड दि१९ जून (प्रतीनीधी) :- सिल्लोड-सोयगाव विधानसभा क्षेत्रातील आत्महत्याग्रस्त आणि वीज पडून मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आज मोठा दिलासा मिळाला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालय सिल्लोड येथे एकूण ३४ लाख रुपयांच्या शासकीय मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले.
तालुक्यातील विविध गावांतील एकूण १८ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले. याशिवाय, गेल्या आठवड्यात सारोळा, मोढा बु., पिंपळदरी येथे वीज पडून मृत्यू पावलेल्या ४ नागरिकांच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपये असे १६ लाख रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.
या वेळी आमदार सत्तार म्हणाले, "या कठीण प्रसंगात राज्य शासन पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. अशा संकटग्रस्त कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
कार्यक्रमावेळी तहसीलदार, महसूल अधिकारी व शेतकरी कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.