शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उंटावरून मिरवणूक!प्रियदर्शनी विद्यालयातील उपक्रमाचं खासदार डॉ. भागवत कराड यांच्याकडून कौतुक

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १६ जून –

मनपा केंद्रीय प्राथमिक विद्यालय प्रियदर्शनी येथे शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ अनोख्या पद्धतीने करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उंटावरून स्वागत करत प्रवेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या प्रवेश दिंडीने झाली. पालखीत ठेवलेली पुस्तके आणि शाळेच्या सिम्फनी बँडच्या देशभक्तिपर सुरांनी परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या वेळी खासदार डॉ. भागवत कराड, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, व जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी गीता तांदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रारंभिक मुख्याध्यापक संजिव सोनार यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत केले. खासदार डॉ. कराड यांनी शाळेमध्ये राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे व सिम्फनी बँडच्या कामगिरीचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे संयोजन तेजस्विनी देसले यांनी केले. यावर्षी पहिल्या इयत्तेत तब्बल ४० नव्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, इतर वर्गांमध्येही ५० हून अधिक नव्या प्रवेशांची नोंद झाली आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बी. आर. राठोड, रश्मी होनमुटे, मनीषा नगरकर, स्मिता मुळे, सुनीता जोशी, प्रतिभा गावंडे, मोनिका चव्हाण, पूजा सोनवणे, शुभांगी जमधडे, सफा सिद्दिकी आणि मीरा मोरे यांनी परिश्रम घेतले.