‘राष्ट्रवादी’कडून ओबीसी संघटन मजबूत करण्याची मोहीम; फैसल मुजावर यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

‘राष्ट्रवादी’कडून ओबीसी संघटन मजबूत करण्याची मोहीम; फैसल मुजावर यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
‘राष्ट्रवादी’कडून ओबीसी संघटन मजबूत करण्याची मोहीम; फैसल मुजावर यांची शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २३ :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांच्या ओबीसी विभागाकडून औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्षपदी फैसल मुजावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार Sharad Pawar यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.

पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार Supriya Sule यांच्या सूचनेनुसार राज्यभर ओबीसी संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ओबीसी समाजातील सर्व घटकांना संघटन प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.

जिल्ह्यातील तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख तसेच स्थानिक नेत्यांच्या सहकार्याने ३० एप्रिल २०२६ पर्यंत या नियुक्त्या पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित माहिती व्हॉट्सअ‍ॅप किंवा पोस्टद्वारे पक्ष कार्यालयात पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आक्रमकपणे काम करण्याची अपेक्षा व्यक्त करत मुजावर यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नियुक्तीबद्दल ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, औरंगाबाद शहर अध्यक्ष ख्वाजा शरफुद्दीन, राष्ट्रीय उपाध्यक्ष वीणा ताई खरे, राज्य समन्वयक आसिफ खलीफे, सलीम बेग, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष इलियास किरमानी, मराठवाडा अध्यक्ष जीतेंद्र अटक, संजय दूधगावकर तसेच अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सैय्यद लईकोद्दीन यांनी अभिनंदन केले.

👉 “संघटन बळकट, तरच समाज सशक्त” — या ध्येयाने आता ओबीसी संघटना नव्या जोमाने पुढे सरकणार आहे.