मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : जानेवारीच्या सन्मान निधीची प्रक्रिया सुरू
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतीनीधी) दि २४ :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया २३ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट निधी जमा होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
महायुती सरकारच्या वचनबद्धतेनुसार राज्यातील पात्र महिलांना आर्थिक बळकटी देण्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योजना प्रभावीपणे राबवली जात असल्याचे सांगण्यात आले.
महिला व बाल विकास मन्त्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा विश्वास आणि सरकारचा दृढ निश्चय यामुळे योजनेची दमदार वाटचाल पुढेही सुरू राहील.”
राज्यातील लाखो महिलांसाठी ही आनंदाची बातमी असून, आर्थिक सहाय्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या सक्षमीकरणाला नवी ताकद मिळणार आहे.
👉 तुमच्या खात्यात निधी जमा झाला का? तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा!