ड्रग्स, हुंडा, मोबाईल व्यसनावर विद्यार्थ्यांचा ‘मूक आघात’ – उद्या आमखास मैदानावर SOCIORENA 2.0

ड्रग्स, हुंडा, मोबाईल व्यसनावर विद्यार्थ्यांचा ‘मूक आघात’ – उद्या आमखास मैदानावर SOCIORENA 2.0
ड्रग्स, हुंडा, मोबाईल व्यसनावर विद्यार्थ्यांचा ‘मूक आघात’ – उद्या आमखास मैदानावर SOCIORENA 2.0

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३१ —

समाजात वाढत चाललेल्या वाईट सवयी, घातक रूढी-परंपरा आणि व्यसनाधीनतेमुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असताना, याविरोधात थेट आवाज उठवण्याचे काम चिमुकल्या विद्यार्थ्यांनी हाती घेतले आहे. SOCIORENA 2.0 या मूक समाजजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून नर्सरी ते हायस्कूलपर्यंतचे विद्यार्थी उद्या सायंकाळी ५.३० वाजता आमखास मैदानावर प्रभावी सादरीकरण करणार आहेत.

ड्रग्सचे वाढते प्रमाण, गुन्हेगारीकडे झुकणारे युवक, मोबाईलचा अतिवापर, महिलांची असुरक्षितता, हुंडाबळी, मानसिक आरोग्य यांसारख्या गंभीर प्रश्नांवर विद्यार्थ्यांकडून मूक अभिनयाच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखवला जाणार आहे.

या कार्यक्रमात ३५ ज्वलंत सामाजिक विषयांवर आधारित पोस्टर्स घेऊन जनजागृती करण्यात येणार आहे. पाणीटंचाई, अन्नाची नासाडी, बालमजुरी, व्यसनाधीनता, हुंडा प्रथा, तंत्रज्ञानाचा गैरवापर, सामाजिक विषमता आणि नैतिक मूल्यांची घसरण या विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना स्कॉलर्स ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत चोख आणि रोखठोक उत्तरे दिली. समाजघडणीत विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक विद्यार्थ्यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेत हुजैफा मारिया, तायबा तहरीम, इफरा इम्तियाज, अनाबिया, लायबा फारुकी, बुशरा नदीम, अनस सिद्दीकी, अरहाम, अरीब इनामदार, शेख आयेशा, मुस्कान शेख आणि मुजीबार अंबेकर उपस्थित होते.