जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समित्यांच्या गठनाला गती; आमदार अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनंतर आयोगाची तातडीची कारवाई

जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समित्यांच्या गठनाला गती; आमदार अब्दुल सत्तार यांच्या सूचनेनंतर आयोगाची तातडीची कारवाई

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २३ :- राज्यातील अल्पसंख्याकांच्या विविध प्रश्नांना गती देण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समित्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी, तसेच मार्टिच्या (Maulana Azad Research & Training Institute) कामाचा सखोल आढावा घ्यावा, अशी मागणी आमदार Abdul Sattar यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.

या संदर्भात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष Pyare Khan यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची दखल घेत अध्यक्ष प्यारे खान यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय अल्पसंख्याक समित्यांचे गठन करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे राज्यातील अल्पसंख्याक कल्याणाच्या कामांना वेग मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या वेळी महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य Wasim Sheikh, राज्य सदस्य वसीम बुऱ्हाण, नगरसेवक हॅप्पी सिंग (BMC) तसेच गुलाम रसूल शेख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी अशा समित्यांची गरज अधोरेखित केली.

राज्यातील विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरीय समित्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असून, या निर्णयामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होणार आहे.

👉 आता अल्पसंख्याकांच्या प्रश्नांना मिळणार थेट आवाज आणि जलद न्याय — हीच अपेक्षा!