जनतेच्या समस्यांसाठी AIMIM मैदानात; महापालिका व वीज विभागाला तीन महत्त्वपूर्ण निवेदने!

नासेर सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील ड्रेनेज, सांडपाणी आणि पथदिव्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाचे वेधले लक्ष

जनतेच्या समस्यांसाठी AIMIM मैदानात; महापालिका व वीज विभागाला तीन महत्त्वपूर्ण निवेदने!
जनतेच्या समस्यांसाठी AIMIM मैदानात; महापालिका व वीज विभागाला तीन महत्त्वपूर्ण निवेदने!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : दि १७ 

शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत नागरी समस्यांच्या सोडवणुकीसाठी AIMIM पक्षाची शहर टीम मैदानात उतरली आहे. AIMIMचे शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिका आणि विद्युत विभागाला विविध समस्यांसंदर्भात तीन महत्त्वपूर्ण निवेदने देण्यात आली. संबंधित परिसरातील ड्रेनेज व्यवस्था, सांडपाण्याचा प्रश्न आणि पथदिव्यांच्या अभावामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

१. दादा कॉलनीतील खुली गटार भूमिगत करण्याची मागणी

प्रभाग क्रमांक १६ मधील दादा कॉलनी परिसरात राणी मेडिकल ते आदिल किराणा दुकानापर्यंतची खुली व चोकअप झालेली गटार भूमिगत करण्याची मागणी करण्यात आली. तसेच हॉटेल बग्गा येथून येणारे सांडपाणी श्मशानभूमीजवळील मोठ्या नाल्याला जोडण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. खुल्या गटारीमुळे परिसरात अस्वच्छता, दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

२. जुना मोंढा परिसरातील नाली बंद करण्याची मागणी

जुना मोंढा परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली खुली नाली भूमिगत करावी किंवा सिमेंट स्लॅब टाकून बंद करावी, अशी मागणी करण्यात आली. नालीतील दूषित पाणी रस्त्यावर वाहत असल्याने शाळकरी मुले तसेच मंदिर आणि मशिदीत जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

३. रंगटीपुरा परिसरात नवीन पथदिवे बसविण्याची मागणी

प्रभाग क्रमांक १६ मधील रंगटीपुरा तसेच इतर परिसरात नवीन स्ट्रीट लाईटचे खांब आणि दिवे बसविण्याची मागणी विद्युत विभागाकडे करण्यात आली. परिसरात पुरेशा प्रकाशाची व्यवस्था नसल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणी येत असून चोरी आणि अपघातांची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

तातडीने सर्वेक्षण करून कामे सुरू करण्याची मागणी

संबंधित समस्यांबाबत यापूर्वीही वारंवार निवेदने देण्यात आली; मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप AIMIMच्या वतीने करण्यात आला. प्रशासनाने तातडीने संबंधित भागांचे सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करावे आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी, अशी मागणी करण्यात आली.

नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून उत्तर देण्याची भूमिका AIMIMने घेतली असून, जनतेच्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी पक्ष सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित