ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी हाजी अब्दुल जब्बार बागवान यांचे निधन
पिंपरी राजा दि १५ :- मराठवाडा विभागातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आणि मोसंबी व संत्रा शेतीतील प्रसिद्ध प्रगतिशील शेतकरी जनाब हाजी अब्दुल जब्बार मो. गौस बागवान (JP), रा. पिंपरी राजा यांचे आज, रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली असून, विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोसंबी व संत्रा शेतीच्या क्षेत्रात त्यांनी प्रगतिशील शेतकरी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
त्यांचा दफनविधी आज नमाज-ए-मगरीबनंतर पिंपरी येथे करण्यात येणार आहे.
इन्ना लिल्लाही व इन्ना इलैही राजिऊन.
अल्लाह तआला मरहूम यांची मगफिरत फरमावो, त्यांच्या कबरीला जन्नतमधील बाग बनवो आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती व सब्र अता फरमावो.
आमीन सुम्मा आमीन.