गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीत शासकीय हस्तक्षेपाचा आरोप; काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बहुमत असलेल्या विकास पॅनलचा अधिकार डावलण्याचा प्रयत्न; शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाचा अध्यादेश रद्द करण्याची मागणी

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीत शासकीय हस्तक्षेपाचा आरोप; काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपद निवडणुकीत शासकीय हस्तक्षेपाचा आरोप; काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलेल्या विकास पॅनलला सत्तास्थापनेची संधी न देता शासनाकडून नियमबाह्य हस्तक्षेप केला जात असल्याचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केला आहे. या प्रकरणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

काँग्रेसने आपल्या निवेदनातून तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. गोकुळ दूध संघाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेला शासननियुक्त सदस्यांच्या मतदानाच्या अधिकारासंदर्भातील अध्यादेश तातडीने रद्द करावा, अध्यक्षपदाची निवडणूक कोणत्याही राजकीय दबावाशिवाय पारदर्शक पद्धतीने घ्यावी आणि स्पष्ट बहुमत मिळवलेल्या विकास पॅनलला कायदेशीररीत्या सत्ता स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन निवेदनातील मागण्या राज्य सरकार आणि सहकार मंत्रालयाकडे तातडीने पाठवाव्यात, अशी विनंतीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. हा प्रश्न केवळ एका दूध संघापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संपूर्ण सहकार चळवळीच्या स्वायत्ततेशी आणि लोकशाहीच्या रक्षणाशी संबंधित असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम, ज्येष्ठ नेते इब्राहिम पठाण, पप्पू कलानी, शेख अथर, मोहम्मद जाकेर, मोहम्मद अफजल, संजय धर्मरक्षक, मुझफ्फर खान पठाण, रामभाऊ लोखंडे, शेख इम्रान, ऋषिकेश महाजन, दुर्गेश वैद्य, नदीम सौदागर, साजिद कुरैशी, अस्मत खान, शाकेर पटेल, नसीब खान, मोहम्मद आदिल, सरचिटणीस इंजि. विशाल बन्सवाल यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित