बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी डॉ. प्रतापसिंह पाटील यांचे अभिवादन
शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळाला भेट देत वाहिली आदरांजली; मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानातील योगदानाचे केले स्मरण ।
मुंबई दि १७ :- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादर येथील शिवाजी पार्कमधील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन विनम्र अभिवादन केले.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांनी आदरांजली अर्पण केली. मराठी माणसाच्या हक्कांसाठी बाळासाहेबांनी आयुष्यभर ठाम भूमिका घेतली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला त्यांनी बुलंद आवाज दिला. आपल्या रोखठोक वक्तृत्वातून त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या भावना प्रभावीपणे मांडल्या.
मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे यावेळी कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले.
महाराष्ट्र वाणी न्यूज | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित