नेहरू आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन

नेहरू आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन
नेहरू आणि लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसतर्फे अभिवादन

छत्रपती संभाजीनगर दि १४ :- भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू तसेच महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि युद्धकलेचे प्रशिक्षक लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली छावणी परिषद परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नेहरूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी पंडित नेहरू यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये देशात रुजविण्यात नेहरूंचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. औद्योगिकीकरण, शिक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांनी दिलेल्या प्राधान्याचाही गौरव करण्यात आला. नेहरूंच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेत संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि बंधुतेच्या रक्षणासाठी युवकांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच आद्य क्रांतीगुरू म्हणून ओळखले जाणारे लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्यालाही अभिवादन करण्यात आले. त्यांनी तरुणांना आणि स्वातंत्र्यसैनिकांना कुस्ती, दांडपट्टा, तलवारबाजी व नेमबाजीचे प्रशिक्षण देऊन त्यांच्यात शौर्य आणि देशभक्तीची भावना निर्माण केली. युद्धकलेसोबतच सामाजिक परिवर्तनाच्या कार्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. महात्मा जोतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीशिक्षणाच्या चळवळीला तसेच विविध सामाजिक कार्यांना त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

या अभिवादन कार्यक्रमाला सरोज जेकब, अशोक डोळस, जगन्नाथ काळे, गुलाब पटेल, भाऊसाहेब जगताप, इंजि. विशाल बन्सवाल, सूर्यकांत गरड, योगेश थोरात, राहुल सावंत, महेंद्र रमंडवाल, पुंडलिक जंगले, मोहम्मद जाकेर, दिलीप भोसले, संजय धर्मरक्षक, संदीप बोरसे, रामभाऊ लोखंडे, ऋषिकेश महाजन, कल्याण चव्हाण, दुर्गेश वैद्य, अस्मत खान, रमेश काळे, सलीम खान, मुसा पटेल, चंद्रकांत बनसोडे, चंद्रकांत जोजारे, सय्यद फय्याजुद्दीन, सय्यद जाकीर, सोमीनाथ पळसकर, नसीब खान, उत्तम दणके, खालेदखा पठाण, मुनीर पटेल, अर्जुन ठोंबरे, मुदस्सिर अन्सारी यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र वाणी | 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित