चिपळूणच्या डॉ. नाझनीन चिकटे यांना कॅनडातील विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी; परिसरात आनंदाची लाट
महाराष्ट्र वाणी न्युज
चिपळूण, दि. १४ जून :- चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते गावातील डॉ. नाझनीन खलील चिकटे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा गाठत कॅनडातील नामांकित विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. १० जून रोजी आयोजित विशेष समारंभात त्यांना ही पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.
डॉ. नाझनीन यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कळंबस्तेसह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या जात आहेत.
डॉ. नाझनीन यांचे हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
– डॉ. नाझनीन चिकटे यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा
!