"ऑपरेशन प्रहार" अंतर्गत विदेशी दारूसह ४.१० लाखांचा मुद्देमाल जप्त – एकाविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि १७ जून :- राज्य उत्पादन शुल्क विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या "ऑपरेशन प्रहार" या विशेष मोहिमेंतर्गत अवैध मद्यविक्री व वाहतुकीवर मोठी कारवाई करण्यात आली. ओअॅसिस चौक, एमआयडीसी वाळूज परिसरात सापळा रचून विनोद भिमराज साळवे (वय ४१, रा. साईनगर, मिसारवाडी) या इसमाला अवैधरीत्या विदेशी मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले.
या कारवाईत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत गुन्हा नोंदवून, त्याच्याकडून एक चारचाकी वाहन व विदेशी दारूसह एकूण ₹४,१०,५२० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई अधीक्षक मा. श्री. अभिनव बालुरे, उपअधीक्षक मा. श्री. गुनाजी क्षीरसागर व निरीक्षक श्री. अजय टी. बगाटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक श्री. अजय बगाटे, दुय्यम निरीक्षक गणेश उंडे, बाळासाहेब नवले, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, जवान योगेश घुनावत, विजय पवार, बाबासाहेब करपे, कु. नम्रता धनेधर आणि चालक किसन सुंदर्ड यांच्या पथकाचा सहभाग होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास निरीक्षक श्री. अजय बगाटे करत आहेत.