“एकता की रात” : ईद मिलन सोहळ्यातून बंधुता आणि समानतेचा संदेश – सुजात आंबेडकर
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ८:- छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “एकता की रात – जश्न-ए-ईद मिलन” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एम्पेरियल लॉन्स येथे ७ एप्रिल रोजी झालेल्या या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात प्रतिसाद मिळाला. या वेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सुजात आंबेडकर यांनी ईद हा केवळ आनंदाचा आणि उत्सवाचा सण नसून तो बंधुता, एकता आणि समानतेचा संदेश देणारा सण असल्याचे सांगितले. “आपण सर्वांनी एकत्र येत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेल्या समानतेवर आधारित भारताच्या स्वप्नासाठी काम केले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रात मुस्लीम समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी वंचित बहुजन आघाडी ही एकमेव पक्ष असल्याचा दावा देखील केला.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच मुस्लिम समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचा संदेश दिला.
👉 “सण साजरे करण्यापलीकडे, समाजाला एकत्र आणणारी हीच खरी ‘एकता की रात’ ठरली!”