१० मार्चला पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडणूक; विशेष सभेची घोषणा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडीसाठी १० मार्च रोजी दुपारी २ वाजता विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकींसाठी संबंधित तालुक्यांच्या उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर ग्रामविकास विभागाने २० मार्चपूर्वी सर्व पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आदेश काढत १० मार्च रोजी विशेष सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.
निर्धारित आरक्षणानुसार प्रथम सभापतींची निवड होईल. त्यानंतर उपसभापतींची निवड केली जाणार आहे. सभेच्या दोन तास आधी सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशन अर्ज स्वीकारले जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तालुकानिहाय आरक्षण व पीठासीन अधिकारी
सोयगाव — पीठासीन अधिकारी: एकनाथ बंगाळे | आरक्षण: नागरिकांचा मागास प्रवर्ग
सिल्लोड — निलेश अपार | सर्वसाधारण (महिला)
कन्नड — संतोष गोरड | सर्वसाधारण (महिला)
फुलंब्री — निलम बाफना | सर्वसाधारण
खुलताबाद — सुचिता शिंदे | नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
वैजापूर — अरुण जहऱ्हाड | अनुसूचित जाती (महिला)
गंगापूर — विजय राऊत | सर्वसाधारण
संभाजीनगर — व्यंकट राठोड | सर्वसाधारण
पैठण — प्रवीण फुलारी | सर्वसाधारण (महिला)
राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, तालुकानिहाय समीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
👉 १० मार्चची ही निवड प्रक्रिया कोणाचे राजकीय गणित जुळवते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष!